Success Story : मेंढपाळ कुटुंबातील मुलगी झाली पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात अनेक अडचणी असतात. कोणी त्या अडचणी खाली दबून नाईलाजाने शिक्षण सोडतं तर कोणी त्या अडचणींवर मात करून जीवनात यशस्वी होते आज आपण अशाच एका जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊन सुद्धा जीवनात यशाचे शिखर गाठणाऱ्या मुलीची success story पाहणार आहोत.

अहमदनगर : – आपण जिचा प्रवास पाहणार आहोत तिचे संपूर्ण नाव हर्षदा कुंडलिक कांदळकर असे आहे. तिचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोडी या गावी झाला. पण तिच्या कुटुंबाचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे हे आहे. तिच्या कुटुंबाचा परंपरागत मेंढीपालनाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नेहमी एका गावाकडून दुसऱ्या गावी स्थलांतर करायला लागत असे. 

आजीनेच केला लहानपणापासून सांभाळ (Success Story)

हर्षदा चा जन्म झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला ती सात वर्षाची असल्यापासून तिच्या आजीकडे ठेवले व आजीने च हर्षदाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली.  हर्षदा शाळेत तशी लहानपणा पासून हुशार मुलगी होती आजीच्या कष्टाची व आई वडिलांच्या मेहनतीची जाणीव असल्यामुळे ती अभ्यास करताना मनापासून करत. शाळेत ती अभ्याससोबत खेळांमध्ये ही आवडीने भाग घेत. असे करत करत  पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हर्षदाने आजीच्या मदतीनेच पूर्ण केले.बारावीला चांगले गुण मिळाले पण बारावी झाल्यानंतर आई-वडील व नातेवाईक लग्नासाठी विचारणी करू लागले. पण तिच्या आजीचे स्वप्न नातीला खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायचे होते त्यामुळे घरातील सर्व लोकांचा विरोध पत्करून हर्षदा ला शिकवण्याचे निर्धार केला.

बारावी झाल्यावर घेतला डिफेन्सला जायचा निर्णय

हर्षदा लहानपणापासून सर्व खेळांमध्ये शाळेत आघाडीवर असायची खेळाची आवड असल्यामुळे तिने डिफेन्स ला जायचं निर्णय घेतला आणि पुढील शिक्षणासाठी तिने लोणी येथे FY – BA ऍडमिशन घेतले. त्या काळात तिच्या शिक्षणाचा व तिचा पूर्ण सांभाळ आजी व तिच्या मावशीने केला नंतर कॉलेजचे शिक्षण घेत असताना तिने सिन्नर येथील एक पोलीस भरतीची अकॅडमी लावली आणि भरतीची तयारी सुरू केली भरतीची तयारी करताना अभ्यास खूप केला सोबतच आजीला हातभार लागावा म्हणून रानातील सर्व कामे सुद्धा केली सहा महिने दिवस रात्र अभ्यास आणि ग्राउंड ची तयारी केली. तेवढ्यात 2022 ला आर्मी भरतीचा फॉर्म भरला पण दुर्दैवाने उंचीत बाहेर काढले , त्यानंतर हताश न होता तिने पोलीस भरतीचा फॉर्म भरला. पोलीस भरतीची संपूर्ण माहिती घेऊन अभ्यास चालू केला सोबतच रनिंग , गोळा फेक याची उत्तम तयारी केली. पहिल्या प्रयत्नातच पोलीस व्हायचे हे तिने ठरवले. पहिले ग्राउंड होते , पहिलीची पोलिस भरती असल्यामुळे तिच्या मनात थोडी भीती होती पोलिस भरतीचे ग्राऊंड 50 गुणांचे असते त्यात 50 पैकी 35 गुण मिळाले आता राहिलेला लेखीचा पेपर तो असतो 100 गुणांचा तो ही चांगला गेला त्यामध्ये 100 पैकी 73 गुण मिळाले आणि हर्षदाने जसे ठरवले होते तसेच झाले  पहिल्या प्रयत्नातच हर्षदाची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली.

हर्षदा म्हणते की ,

“आज मी जे काही आहे ते माझ्या आजी व मावशीच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने आहे आजी ने माझ्या लग्नाला विरोध केला नसता तर मी स्वप्न पाहू शकले नसते व ती पूर्ण पण करू शकले नसते “

हर्षदाचा हा प्रवास सर्व खेड्या गावातील तरुण मुला मुलींसाठी खूप प्रेरणादायी आहे तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

Leave a Comment

× आताच E-book डाउनलोड करा ?