बापाच्या कष्टाचं फेडले पांग| शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वनअधिकारी(Marathi motivational story)
शेतकऱ्याची मुलगी आणि क्लास वन अधिकारी – हे दोन्ही शब्द एकत्रितपणे ज्ञानेश्वरी नावाच्या एका धाडसी तरुणीची अद्भुत कहाणी सांगतात. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तिने पार केलेल्या अडथळ्यांची आणि जिद्दीची ही गाथा केवळ यशाचीच नाही तर प्रेरणेचीही आहे.
लातूर :- लातूर जिल्ह्यातील टाका या गावची ज्ञानेश्वरी यांनी राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवत गावातील पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळालेला आहे. ज्ञानेश्वरी यांचे वडील सूर्यकांत तोळमारे हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्ञानेश्वरी यांची आई गृहिणी आहे व त्याचबरोबर ती वडिलांना शेतात मदत सुद्धा करते. घरातील परिस्थिती तशी बेताचीच पण काहीतरी मोठे करून आई-वडिलांना सुखाचे दिवस दाखवायचे हे ज्ञानेश्वरी यांनी ठरवले होते. ज्ञानेश्वरी अभ्यास खूप हुशार होत्या. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या राहत्या गावात टाका येथेच झाले. शाळेत एक हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांची ओळख होती. 10 वी ला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर घरच्यांनी लातूर ला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथून अकरावी बारावी ला प्रवेश घेतला.त्यांनी लहानपणापासून ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समस्या जवळून पहिल्या होत्या काही शैक्षणिक व सामाजिक समस्या स्वत अनुभवलेल्या होत्या. या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अधिकारी कसे होता येते हे पण सुरूवातीला त्यांना माहिती नव्हते. मग त्यांनी महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा पास केली की अधिकारी होता येत हे कोणाकडून तरी समजले. एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर ज्ञानेश्वरी यांनी एमपीएससी करण्याचा निर्धार केला व घरी आई वडिलांना त्या बद्दल सांगितले घरी वडील खूप खुश झाले व आईवडिलांनी एमपीएससी चा अभ्यास करण्याची परवानगी दिली.
गावातून पुण्याला: शिक्षणाचा प्रवास पण कोरोनाचे संकट
पदवीचे शिक्षण पूर्ण करत करत एमपीएससी ची बेसिक माहिती त्यांनी पदवीच्या शिक्षणाबरोबर मिळवलेली होती आणि एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी सर्वसामान्य मुलांप्रमाणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्याला गेल्या. गावातून पुण्याला येऊन शिक्षण घेणं सोपं नव्हतं. पण ज्ञानेश्वरीने हार मानली नाही. पुण्यात गेल्यानंतर अभ्यास जोमाने चालू केला चार ते पाच महिने चांगला अभ्यास चालू होता पण त्याच काळात कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन पडले सुरुवातीचे लॉकडाऊन थोडे शिथिल असल्या कारणाने त्या गावाकडे गेल्या. गावाकडे गेल्या तरी त्यांनी अभ्यास थांबवला नाही घरातील कामे सांभाळून अभ्यास चालू ठेवला आणि तिथून पुढे गावातूनच अभ्यास करू लागल्या व अभ्यासासाठी पुण्याला गेल्या नाही. गावाकडे त्यांच्या मोठ्या भावाने ही अभ्यास त्यांना मार्गदर्शन केले.
पाहिल्या पेपरातच पूर्व आणि मुख्य परीक्षा पास पण Interview फेल (Marathi motivational story )
2020 ला पहिली राज्यसेवा दिली अभ्यास चांगला झाला होता त्यामुळे पूर्व परीक्षा पास झाली मुख्य परीक्षा ही ती पास झाली. मुलाखती दिली मुलाखत पण चांगली गेली होती आता आपले सिलेक्शन पहिल्या प्रयत्नातच होईल असं तिला वाटले पण मुलाखतीत सात मार्क कमी पडून तिची पोस्ट गेली.पण नाराज न होता ज्ञानेश्वरीने ती गोष्ट सकारात्मक पणे घेतली आपण पाहिल्याच प्रयत्नात जर राज्यासेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झालो हे पाहून तिचा आत्मविश्वास खूप वाढला व ज्ञानेश्वरीने झालेल्या चुकांमधून सुधारणा करत करत अभ्यास चालू केला व येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आणि अभ्यास चालू ठेवला या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळवले व सहाय्यक कक्ष अधिकारी ( ASO ) झाल्या. तरीही त्यांनी अभ्यास थांबवला नाही कारण त्यांचे स्वप्न राज्यसेवा पास करून क्लास वन अधिकारी होणे हे होते.
नंतर त्यांनी 2021 ची राज्यसेवेची पुन्हा एकदा परीक्षा दिली झालेल्या चुकांमधून सुधारणा केल्या मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा चांगला अभ्यास केला आणि पूर्व परीक्षा दिली. पूर्व परीक्षा चांगली गेल्यामुळे ती पास नक्की होईल असा आत्मविश्वास असल्यामुळे पूर्वचा रिजल्ट लागण्याच्या आधीच त्यांनी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात केली 2 महिन्याने पूर्व परीक्षेचा निकाल लागला अपेक्षेप्रमाणे पूर्व परीक्षा पास झाल्या नंतर आली मुख्य परीक्षा ती ही चांगली गेली. मुख्य परीक्षेत ही छान मार्क्स पडले. मुलाखतीला पात्र झाल्यानंतर त्यांना मागच्या वेळी मुलाखतीत सात मार्क्स कमी पडल्यामुळे आपल्या हाता तोंडाशी आलेला घास गेला होता हे माहिती होते म्हणून मुलाखतीची तयारी एकदम व्यवस्थित व गांभीर्याने केली. काही ठिकाणी Mock Interview ही दिले मागच्या वेळी मुलाखतीत झालेल्या छोट्या छोट्या चुका ज्यामुले मार्क्स कमी पडले त्या लक्षात आल्या व मुलाखतीची तयारी चांगली केली. मुलाखती दिली मुलाखतीत चांगले गुण मिळाले आणि अखेर त्यांचे लहान पणा पासूनचे स्वप्न पूर्ण झाले. व त्या क्लास वन अधिकारी झाल्या. विशेष म्हणजे त्या वर्षीच्या राज्यासेवा परीक्षेमध्ये त्यांचा राज्यात मुलींमध्ये पंधरावा क्रमांक आला. ( Marathi motivational story )
मानले आईचे विशेषत वडिलांचे आभार (Marathi motivational story )
आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी वडिलांचे विशेषआभार मानले त्या म्हणाल्या की , ग्रामीण भागातील एक अल्पभूधारक शेतकरी असून ही जिथे मुलींना घरातील कामापुरतेच मर्यादित ठेवली जाते फारसे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले जात नाही तिथे त्यांच्या वडिलांनी त्यांना क्लास वन अधिकारी या पदापर्यंत मजल मारण्यास प्रेरित केली आणि नेहमी त्या प्रवासात सोबत राहिले.
ज्ञानेश्वरीचं यश हे केवळ तिचं यश नाही तर, तिच्या कुटुंबाचं आणि गावाचं यश आहे. तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि तिच्या प्रवासात तिला आधारस्तंभ बनून राहिले. गावातील लोकांनीही तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन तिचं मनोबल वाढवलं.आज ज्ञानेश्वरी इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरते. ती दाखवून देते की, कष्ट आणि जिद्द यांच्या आधारावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. ती ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देते आणि त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित करते.ज्ञानेश्वरीची कहाणी ही आशा आणि प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की, आपण आपली स्वप्नं कधीही सोडू नयेत आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत.
ज्ञानेश्वरी म्हणते की ,
“मी इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरू इच्छिते. त्यांनी मला पाहून स्वप्न पाहणे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे सुरू ठेवावे.”
MPSC Police Bharti Guru – तुमच्या यशाचा सोबती!
मग ते UPSC असो, MPSC असो, पोलिस भरती असो, कोणतीही परीक्षा जिंकण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचंय? तर मग आजच “MPSC Police Bharti Guru” या संकेतस्थळाला भेट द्या. अनुभवी मार्गदर्शकांच्या One Liner Notes आणि Topicwise Quiz च्या साहाय्याने तुमच्या स्वप्नांच्या परीक्षेची तयारी करा आणि ज्ञानेश्वरीसारखी यशोगाथा रचा!
या स्पर्धापरीक्षांच्या लढाईत “MPSC Police Bharti Guru” तुमच्या सोबत आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवा, मेहनत घ्या आणि यश तुमच्या पायाशी येईल!
आमचा साठी खुप छान.. प्रेरनादायी आहे.
success व्यक्तींचे आम्हाला अजून काही फोटो पहायला मिळायला हवे. 🙏😊
हो, अहमी त्यांच्या social media अकाऊंट ची लिंक देईन.
I like this motivation video