Success story : सायकलवरून 15 किलोमीटरचा रोजचा प्रवास, शिक्षण आणि घरकाम यांचा त्रिकोणी संघर्ष!

सायकलवरून 15 किलोमीटरचा रोजचा प्रवास, शिक्षण आणि घरकाम यांचा त्रिकोणी संघर्ष! महिलांसाठी प्रेरणादायी, दिपालीची अद्भुत कहाणी!(Success Story)

गरिबी आणि अनेक अडचणींवर मात करत दिपाली लंबतूरे यांनी पुणे रेल्वे पोलिस बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असलेली ही कथा तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व आणि स्वप्नांसाठी कष्ट करण्याची प्रेरणा देईल.

दिपालीचे शिक्षण आणि वडिलांचे स्वप्न:

सोलापूर :- आज आपण जिचा प्रवास पाहणार आहोत त्यांचे नाव दिपाली अरुण लंबतूरे हे आहे. त्यांचा आपण पुणे रेल्वे पोलिस होण्याचा अवघड पण तितकाच इतर मुलींसाठी प्रेरणादायी प्रवास आता पाहणार आहोत. सोलापूरमधील एका सर्वसामान्य कुटुंबात दिपाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शांत, प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावाचे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच चिंतेचे ढग असायचे, कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. ते सेंट्रिंगचे काम करत असत. हे काम कठीण आणि धोकादायक होते, पण ते कुटुंबासाठी दिवसरात्र काम करत असत.दिपालीचे वडील गरिबीच्या परिस्थितीत जीवन जगले होते. शिक्षणाच्या अभावामुळे सेंट्रिंगचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. अन्नधान्याची टंचाई, कपड्यांची वानवा, आणि शिक्षणाचा अभाव यांसारख्या अनेक समस्यांशी त्यांना झुंज देणे भाग पडले होते. स्वतः शिक्षण घेता आले नव्हते, पण त्यांना आपल्या मुलीने गरिबीचा सामना करू नये अशी तीव्र इच्छा होती. त्यांनी दिपालीच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. तिला चांगल्या शाळेत प्रवेश दिला आणि शिक्षणासाठी आवश्यक सर्व गोष्टी पुरवल्या. दिपाली या शाळेमध्ये हुशार होत्या त्यांच्या वडिलांचे स्वप्न आपल्या लेकी ला पोलिस बनवण्याचे होते. वडिलांच्या याच इच्छेला दिपाली यांनी आपले ध्येय बनवले व पोलिस होण्यासाठी ची माहिती त्या मिळवू लागल्या .दिपाली यांनी आपल्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अभ्यासात त्या नेहमीच अव्वल असायच्या. दिपाली या लहानपणापासूनच हुशार होत्या आणि नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची तीव्र इच्छा असायची. अश्यातच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण होत गेले.

SSD GD परीक्षा दिली त्यात ITBP ला सिलेक्शन पण पोस्टिंग हरियाणाला(Success Story)

 कॉलेज पूर्ण केल्यानंतर SSD GD परीक्षा दिली आणि यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेद्वारे त्यांची ITBP मध्ये निवड झाली. निवडीनंतर दिपाली यांना हरियाणा मध्ये पोस्टिंग मिळाली. ITBP मध्ये काम करणं हे त्यांच्यासाठी एक नवीन आणि आव्हानात्मक अनुभव होता.दिपाली या महाराष्ट्रातील राहणाऱ्या होत्या आणि त्या कधीच महाराष्ट्रापासून दूर गेल्या नव्हत्या. हरियाणा मध्ये पोस्टिंग झाल्यामुळे त्यांना कुटुंबाची खूप आठवण येऊ लागली. कुटुंबाची खूप आठवण येवू लागली असल्यामुळे त्यांचे कामात मन सुद्धा लागेना आणि महाराष्ट्राशी असलेले प्रेम यामुळे दिपाली यांनी ITBP मधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती.आधीच लोकांना या काळात साधी नोकरी लागणे हे एक कठीण काम होते त्यात लागलेली ती पीएन सरकारी नोकरी असे सोडून जाणे त्यांच्या बुद्धीला बरोबर वाटत नव्हते त्याच बरोबर लोक की म्हणतील आपल्याला परत गावी गेल्यावर दुसरी सरकारी राहुदे पण साधी नोकरी त्री मिळेल का हे प्रश्नांचे काहूर त्यांच्या डोक्यात येवू लागले पण त्यांचे मन लागत नसल्यामुळे त्यांनी जास्त विचार न करता त्या नोकरी चा राजीनामा दिला व केंद्र सरकारमधील नोकरी सोडून महाराष्ट्रामध्ये आपल्या कुटुंबासाठी परत आल्या. 

दीपाली यांना ITBP मधील कामाचा अनुभव अनेक प्रकारचा होता. काही सकारात्मक तर काही नकारात्मक.

सकारात्मक अनुभव:

  • नवीन कौशल्ये शिकणे: ITBP मध्ये दीपाली यांना शिस्त, नेतृत्व, आणि शारीरिक तंदुरुस्ती यांसारख्या अनेक नवीन कौशल्यांचे प्रशिक्षण मिळालं.
  • देशसेवा: ITBP मध्ये काम करून दीपाली यांना देशसेवा करण्याचा आणि राष्ट्राच्या सुरक्षेत योगदान देण्याचा अभिमान होता.
  • नवीन मित्र बनवणे: ITBP मध्ये दीपाली यांना देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या अनेक नवीन मित्र बनवण्याची संधी मिळाली. 

नकारात्मक अनुभव:

  • कुटुंबापासून दूर राहणे: ITBP मध्ये काम करण्यासाठी दीपाली यांना महाराष्ट्रापासून दूर हरियाणा मध्ये जावं लागलं. त्यांना कुटुंबाची खूप आठवण येत असे.
  • कठीण परिस्थिती: ITBP मध्ये काम करणे हे कठीण आणि आव्हानात्मक होते. दीपाली यांना कठोर प्रशिक्षण आणि कठीण परिस्थितीत काम करण्याचा अनुभव आला.

दिपाली यांचे गावी आगमन आणि पुन्हा पोलिस भरतीची तयारी:(Marathi motivational story)

ITBP मधील नोकरी सोडून दिपाली गावी परत आल्या. कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्याचा त्यांना आनंद होता. पण काही दिवसानंतर त्यांना पुढील वाटचालीचा विचार येवू लागला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपालीने पुन्हा एकदा पोलिस भरती परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिने अभ्यासासाठी वेळापत्रक बनवले आणि नियमितपणे अभ्यासाला लागली. शारीरिक तंदुरुस्तीसाठी तिने व्यायाम आणि क्रीडा स्पर्धांमध्येही भाग घेणे सुरू केले. दिपालीने पोलिस भरतीची तयारी सुरू केल्यानंतर काही लोकांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी तिला टोमणे मारून म्हटले की, “तू लागलेली केंद्र सरकारची नोकरी सोडून पळून आली. तू कशी काय पोलिस होशील?” लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून दिपाली यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीने लोकांच्या टीकेला उत्तर देण्याचा निर्णय घेतला. दिपाली यांनी वडिलांच्या स्वप्नाला आणि आपल्या ध्येयाला प्राधान्य दिले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. तिने प्रेरणादायी पुस्तके वाचली आणि आपल्या आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

प्रेमविवाह आणि संघर्षाची सुरुवात:

पोलिस भरतीची तयारी करत असतानाच दीपालीचे प्रेमविवाह झाले. तिच्या पतीने तिच्या ध्येयाला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिच्या प्रवासात खंबीर आधारस्तंभ बनून राहिला. लग्न झाल्यानंतर दीपालीच्या जीवनाचा खरा संघर्ष सुरू झाला. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांना क्लास व ग्राऊंड वरुन घरी येण्यासाठी सायकल ची साथ मिळाली. पोलिस भरतीचा क्लास आणि ग्राउंड दीपालीच्या घरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर होते. दररोज सकाळी ती सायकलवरून 15 किलोमीटरचा प्रवास करून क्लास आणि ग्राउंडला जात असे. क्लास आणि व्यायामाचा दमलेला शरीर घेऊन ती घरी परतत असे आणि घरातील कामे पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. दिपाली यांनी वेळेचे उत्तम नियोजन करून अभ्यास आणि घरातील जबाबदाऱ्या यांचा समतोल राखला. कठीण परिस्थिती आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या जिद्द आणि ध्येयनिष्ठेचा वापर केला. दिपाली यांच्या पतीने त्यांच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला. तो घरातील कामे आणि जबाबदाऱ्यांमध्ये तिची मदत करत असे आणि तिच्या अभ्यासासाठी प्रेरणा देत असे.

दिपाली आणि पुणे रेल्वे पोलिस भरती:

पोलिस भरती परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांना पुणे रेल्वे पोलिस भरतीची जाहिरात दिसली. त्यांनी आधीच पोलिस भरती परीक्षेचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे त्यांना आत्मविश्वास होता. त्यांनी त्वरित रेल्वे पोलिस भरतीसाठी फॉर्म भरून जमा केला. दिपाली यांना आर्थिक अडचणींमुळे नोकरीची त्वरित गरज होती. त्यांनी रेल्वे पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आणि नोकरी मिळवण्याचा निश्चय केला. त्यांनी दिवसरात्र अभ्यास करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. दिपाली यांनी रेल्वे पोलिस भरती परीक्षा पूर्ण आत्मविश्वासाने दिली. त्यांनी परीक्षेत उत्तम कामगिरी केली आणि यशस्वी होण्याची आशा बाळगली. दिपाली यांनी रेल्वे पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण होण्याची आशा बाळगली होती. परीक्षा निकाल जाहीर झाला आणि दिपाली यांचे पहिल्या प्रयत्नात रेल्वे पोलिस म्हणून निवड झाली निवड झाल्याची बातमी ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांच्या कठोर परिश्रम आणि जिद्दीला यश मिळालं होतं. दिपाली यांच्या कुटुंब आणि मित्रांनाही तिच्या यशाचा खूप आनंद झाला. त्यांनी दिपालीला तिच्या ध्येयनिष्ठेसाठी आणि कठोर परिश्रमांसाठी अभिनंदन दिले. दिपाली यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांची मुलगी पोलिस बनेल. दीपालीने हे स्वप्न पूर्ण करून आपल्या वडिलांना अभिमानित केले. 

दिपाली यांनी आपल्या वडिलांचे आणि पतीचे या दोघांचे विशेष आभार मानले
तुम्हाला ही जर दिपाली यांच्या सारखे जीवनात यशाचे शिखर गाठून आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर हार न मानता प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल. तुम्हाला ही दिपाली यांची Marathi motivational story कशी वाटली हे आम्हाला comments करून नक्की सांगा.

MPSC Police Bharti Guru – तुमच्या यशाचा सोबती!

मग ते UPSC असो, MPSC असो, पोलिस भरती असो, कोणतीही परीक्षा जिंकण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचंय? तर मग आजच “MPSC Police Bharti Guru” या संकेतस्थळाला भेट द्या. अनुभवी मार्गदर्शकांच्या One Liner Notes आणि Topicwise Quiz  च्या साहाय्याने तुमच्या स्वप्नांच्या परीक्षेची तयारी करा आणि ज्ञानेश्वरीसारखी यशोगाथा रचा!

या स्पर्धापरीक्षांच्या लढाईत “MPSC Police Bharti Guru” तुमच्या सोबत आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवा, मेहनत घ्या आणि यश तुमच्या पायाशी येईल!

.

Leave a Comment

× आताच E-book डाउनलोड करा ?