अंधारातून प्रकाशाकडे:आदित्य दाभाडे यांची प्रेरणादायी कहाणी(Marathi success story)
आदित्य दाभाडे यांच्या जीवनाचा प्रवास हा एका प्रेरणादायी कथेसारखा आहे. लहानपणापासूनच त्यांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. आईचे दुःखद निधन, वडिलांचे व्यसन आणि नातेवाईकांकडून दुर्लक्ष यांसारख्या अनेक अडचणी त्यांना पार कराव्या लागल्या. तरीही त्यांनी हार न मानता शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठी अथक प्रयत्न केले.
लहानपणीच आईचे दुःखद निधन आणि वडिलांचे व्यसन(Success story)
आदित्य दुसऱ्या वर्गात शिकत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाचा आघात सहन करत असतानाच त्यांचे वडील दारूच्या आहारी गेले आणि व्यसनाधीन बनले. आई-वडिलांच्या सावलीशिवाय चार भावंडे अनाथ झाली. नातेवाईकांनीही त्यांना मदत करण्यास नकार दिला. अशा वाईट परिस्थितीत आदित्य यांनी आपल्या भावंडांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कारण त्यांना कुणाच्या त्यांना कोणावर ओझे व्ह्ययचे नव्हते.आदित्य यांना लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव होती. आईच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्याच्यावर आली. वडील व्यसनाधीन असल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती वाईट होती. शिक्षणासोबतच आदित्य यांना घरकाम आणि भावंडांची काळजी घ्यावी लागत होती. आदित्य यांनी दिवसभर राबून हॉटेल मध्ये काम करून आपल्या व आपल्या भावंडांसाठी पैसा कमावला आणि शाळेत जाऊन शिक्षण ही घेतले. अनेकदा त्यांना उपाशी झोपावे लागे. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. शिक्षण आणि भावंडांची काळजी या दोन्ही गोष्टी त्यांनी समतोल राखून पार पाडल्या.
आदित्य यांच्या आजी: एक आधारस्तंभ(Success story)
आदित्य यांच्या जीवनात त्यांच्या आजीचा मोठा वाटा आहे. आईच्या निधनानंतर आणि वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे आदित्य आणि त्यांच्या भावंडांवर अनेक अडचणी आल्या. अशा वाईट परिस्थितीत त्यांच्या आजीने त्यांना आधार दिला आणि त्यांची काळजी घेतली. त्यांनी फळे विकून आणि शेतात काम करून आदित्य आणि त्यांच्या भावंडांची काळजी घेतली. आदित्य यांच्या आजीने त्यांना फक्त आर्थिक मदतच केली नाही तर त्यांना प्रेम आणि काळजीही दिली. त्यांनी आदित्य आणि त्यांच्या भावंडांना चांगले संस्कार दिले आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्यास प्रेरित केले. आदित्य यांच्या जीवनात त्यांच्या आजीचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या आजीच्या प्रेरणा आणि मदतीमुळेच आदित्य हे अनेक अडचणी पार करू शकले आणि यशस्वी होऊ शकले.
मामाच्या गावी 11 वी आणि 12 वी आणि आर्मीचे वेड(Success story)
आदित्य यांच्या गावात शिक्षणाची चांगली सोय नव्हती. 10 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागे. आदित्य यांना आश्रमशाळेत शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण त्यांना आश्रमशाळेत प्रवेश मिळाला नाही. अशा परिस्थितीत आदित्य यांच्या मामांनी त्यांना मदत केली. त्यांनी आदित्यला आपल्या गावी बोलावले आणि त्यांच्याकडे राहून 11 वी आणि 12 वी शिक्षण पूर्ण करण्याची सुविधा दिली. आदित्य 11 वी आणि 12 वी शिक्षण घेत असताना त्यांना मामाच्या गावातील मुलांना रोज सकाळी आर्मी भरती ची प्रॅक्टिस करताना बघायला मिळत होते. या मुलांना कडक शिस्तीचे पालन करताना, व्यायाम करताना आणि रणनीती शिकताना बघून आदित्य यांच्या मनात लष्करात जाण्याची इच्छा निर्माण झाली. लष्करातील देशसेवा, शिस्त आणि देशभक्ती या गोष्टींनी त्यांना आकर्षित केले. आदित्य यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी लष्करी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सुरुवात केली. तसेच, त्यांनी लष्करी परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून अभ्यास ही चालू केला. आर्मी मध्ये जाण्यासाठी एक सोडून पाच वेळा प्रयत्न केले. ते दर वेळी ग्राऊंड टेस्टमध्ये उत्तीर्ण झाले पण पाची वेळा मेडिकल टेस्टमध्ये अडकले. आदित्य यांनी लष्करात जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेरीस त्यांनी आसाम रायफल परीक्षा उत्तीर्ण झाली. हे त्यांच्यासाठी यशाचा क्षण होता. आता ट्रेनिंग ला जायचे दिवस जवळ येत होते पण पण त्याच क्षणी त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. व त्यांना ट्रेनिंग ला जाता आले नाही
वडिलांचे निधन आणि नाशिकचा प्रवास (Success story)
आता थोडे दिवस जीवनात काय चालू आहे काही समजेना वडिलांच्या निधनामुळे ट्रेनिंगला जाता आले नाही, जवळ कोणती नोकरी नाही काही नाही. आपला खर्च भागवण्यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती म्हणून त्यांनी नाशिक मध्ये सिक्युरिटी गार्ड ची नोकरी स्वीकारली. काही दिवस काम करत असताना त्यांच्या मनात स्वतची अशी चांगली ओळख समाजामध्ये निर्माण करावी असे वाटत होते म्हणून त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास करायचे ठरवले आणि त्यानी पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला त्यानी एका नाशिकच्या अकादमी (Success academy नाशिक) मध्ये ग्राऊंड कोच म्हणून काम सुरू केले. ग्राऊंड कोच म्हणून आदित्य यांच्या कामात पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण देणे समाविष्ट होते. त्यांना उमेदवारांना धावणे, उडी मारणे, व्यायाम करणे आणि इतर शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचण्यांसाठी तयार करणे आवश्यक होते. सोबतच ग्राऊंड कोच म्हणून काम करताना आदित्य यांनी पोलिस भरतीची तयारीही सुरू ठेवली. त्यांनी अभ्यासासाठी वेळ दिला आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी नियमित व्यायाम केला.
आदित्य यांचा पोलिस बनण्याचा प्रवास: अथक प्रयत्न आणि यश
पुणे सिटीच्या पोलिस भरतीची जाहिरात आली तेव्हा त्यांनी त्वरित फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. पण, नियतीला वेगळेच मान्य होते. ते एका मार्काने वेटिंग लिस्टमध्ये टाकले गेले. पुण्यात अपयशी ठरल्यानंतर आदित्य निराश झाले, पण हार मानण्यास ते तयार नव्हते. त्यांनी नाशिक पोलिस भरतीसाठी फॉर्म भरला आणि अधिक तीव्रतेने अभ्यास आणि तयारीला सुरुवात केली. ग्राऊंडची कसून प्रॅक्टीस, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यावर त्यांनी भर दिला आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवास संपला त्यांची नाशिक मध्ये निवड झाली.
आदित्य दाभाडे यांची कहाणी ही संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना आपल्या सर्वांकडून पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा |
आदित्य यांच्या सारखे तुम्हाला ही जीवनात यशस्वी व्ह्ययचे असेल तर,
MPSC Police Bharti Guru – तुमच्या यशाचा सोबती!
मग ते UPSC असो, MPSC असो, पोलिस भरती असो, कोणतीही परीक्षा जिंकण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचंय? तर मग आजच “MPSC Police Bharti Guru” या संकेतस्थळाला भेट द्या. अनुभवी मार्गदर्शकांच्या One Liner Notes आणि Topicwise Quiz च्या साहाय्याने तुमच्या स्वप्नांच्या परीक्षेची तयारी करा आणि ज्ञानेश्वरीसारखी यशोगाथा रचा!
या स्पर्धापरीक्षांच्या लढाईत “MPSC Police Bharti Guru” तुमच्या सोबत आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवा, मेहनत घ्या आणि यश तुमच्या पायाशी येईल!