विठ्ठल कांगणे (Marathi motivational story )
विठ्ठल कांगणे हे नाव तुम्ही युट्युब इंस्टाग्राम वरती 100% ऐकले असेल आणि पुढे ही हे नाव ऐकत रहाल. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हटले की त्यात विठ्ठल कांगणे हे नाव आघाडीने पुढे येते. त्यांना तो सोशल मीडिया मुळे खूप प्रसिद्धी मिळालेली आहे पण हे काही एका रात्रीत नाही झाले प्रसिद्धी मिळण्या अगोदरचा त्यांचा वेदनादायी प्रवास आपण पाहणार आहोत
जन्म आणि बालपण
विठ्ठल कांगणे यांचा जन्म परभणी येथे झाला त्यांच्या आईचे ती सातवीत असतानाच दुःखद निधन झाले त्यांची सावत्र आई त्यांच्यावर राग राग करायची, एवढा राग राग करायची की विचारूच नका; त्यांची सख्खी आई वारली तेव्हापासून शाळेत जाताना त्यांच्या सावत्र आईने त्यांना किती जीवनाचा डबा दिला नाही.दहावीपर्यंत ते बिना जेवणाच्या डब्याचे घरातील शाळेत जायचे तेव्हा त्यांच्या मित्रांनी दिवस ठरवून त्यांच्यासाठी जेवण आणलं पण विठ्ठल कांगणे सरांनी कधी या परिस्थितीत बाऊ केला नाही.
कॉलेजच्या जीवनातील अडचणी
११ वी ला ते डीएसएम कॉलेज जिंतूर येथे शिक्षणासाठी गेले. जिंतूर ते डीएसएम कॉलेज इथे पर्यंत नऊशे रुपयाचा पास होता, प्रत्येक बड्या बापाचा पोरगा पास काढून गाडीतून निवांत कॉलेजला जायचा पण विठ्ठल सर पैशाच्या अभावी चालत जायचे त्यांनी अकरावी आणि बारावी चे वर्ष असे पायी चालतच काढले.त्यानंतर ते मामाकडे शिक्षणासाठी गेले. लहानपणी त्यांच्यावर त्यांचे गणिताचे एकलहरे सर यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला व आपणही मोठे झाल्यावर यांच्यासारखेच मुलांना हसत खेळत शिकवायचे हे त्यांनी ठरवले. कॉलेज नंतर त्यांनी डीएड ला प्रवेश घेतला, बीएडला असताना वाईट मित्रांच्या संगतीमुळे कॉलेज मध्ये मस्ती करायचे, मग अभ्यास न केल्यामुळे मार्क कमी पडले. २ मे २०१० ला डी.एड सीईटीची परीक्षा होती, पण परीक्षा फी भरण्यासाठी त्यांकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी क्लासच्या सरांना की भरायला सांगितली आणि त्याच्या बदल्यात क्लास मधील साफसफाई, झाडू मारणे इत्यादी कामे केली. त्याच काळात आणखी एक शिक्षकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला, ते म्हणजे अहिरे सर यांना बघून विठ्ठल कांगणे सरांनी शिक्षक व्हायचे ठरवले. पण कॉलेजमध्ये संगत चांगली नसल्यामुळे अभ्यास न करता बाकीची सर्व कामे केली व व्हायचे नको होते, तेच झाले डी.एड CET ची परीक्षा सहा मार्कांनी फेल झाले.पण त्यांनी त्याच काळात फॉरेस्ट गार्डचा फॉर्म भरलेला होता, त्यात त्यांचे सिलेक्शन झाले
लागलेल्या चांगल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला
काही वर्ष त्यांनी फॉरेस्ट गार्ड म्हणून काम केले परंतु यांच्या आतला मास्तर बनण्याचा किडा त्यांना गप्प बसू देत नव्हता म्हणून त्यांनी मिळालेली सरकारी नोकरी सोडून ते पुन्हा परभणीत आले. परभणीत एका दुसऱ्याच्या क्लासमध्ये दोन वर्ष शिक्षक म्हणून तिने काम केले, थोडे पैसे जमवले आणि अखेर डिसेंबर २०१६ मध्ये स्वतःचा क्लास काढला. सुरुवातीचे तीन-चार महिने फक्त सहाच मुली क्लास मध्ये होते तरीही विठ्ठल कांगणे सर त्यांना शिकवत. त्यांची भाषा त्यांची शिकवण्याची पद्धत मुलांमध्ये अभ्यासाबद्दल आवड निर्माण करू लागले व तीन-चार महिन्यांपूर्वी सहा मुले असलेला क्लास आता शंभर दीडशे मुलांचा झाला
लॉकडाऊन मध्ये सर्व संपले
सर्व चांगले सुरळीत चालत असताना कोरोना आला व लॉकडाऊन पडले. लॉकडाऊन मुळे त्यांचा क्लास बंद झाला. त्याच काळात २०२१ मध्ये यांचे वडिलांचे निधन झाले. लॉकडाऊन होते, क्लास बंद पडलेला पण क्लासच्या जागेची भाडे चालूच होती, गाडी भरण्यासाठी त्यांनी स्वतःची सोन्याची चैन घाण ठेवून पैसे दिले. पण काही महिन्यांनी तेही पैसे संपले आता काय करावे काही कळेना सगळं संपले आहे, असे त्यांना वाटू लागले.
Youtube ची सुरुवात कशी केली
लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धती डोके वर काढत होती तेच पाहून त्यांना एक कल्पना सुचली व त्यांनी सुरूवातीला फक्त त्यांच्या क्लास मधील विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब वरती शिकवणी चालू केली. तिथे पण काही खास रिस्पॉन्स नव्हता, तरी त्यांनी हार मानले नाही आणि ते लेक्चर अपलोड करत राहिले. युट्युब वरती त्यांची एक लेक्चर मधील क्लिप खूप व्हायरल झाली आणि त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली, यांची शिकवण्याची पद्धत युवा पिढीने पार डोक्यावर घेतली आणि तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यांचा तू वायरल व्हिडिओ एका तासात दहा लाख लोकांनी पाहिला आणि तिथून पुढे त्यांची जिंदगी पलटली. यांचे युट्युब वरती सहा लाख पेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. ते आता मुलांना शिकवण्याबरोबर मुलांच्या प्रश्नानं बाबत आंदोलने करणे सरकारला कायद्याच्या चौकटीत राहून स्पर्धा परीक्षांच्या मनमानी कारभार विरोधक जाब विचारतात.
विठ्ठल कांगणे सरांची ही(Motivational story) तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही अशा व्यक्त करतो.