अगर किसी चीज को पुरी शिद्द्त से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी शाजिश में लग जाती है, या वाक्याप्रमाणे राजेश ने ही त्याच्या जीवनात वर्दी वरती लहानपणापासून जिवापाड प्रेम केले आणि 9 वर्षे सातत्याने प्रयत्न करून शेवटी त्याच्या खर्या प्रेमाला म्हणजे पोलिस वर्दीला मिळवलेच त्याची ही Motivational story इतकी सोपी नव्हती त्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याने कश्या प्रकारे त्यावर मात केली हा जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण आता पाहणार आहोत
राजेशचा जन्म आणि बालपण:
सातारा :-राजेशचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पांगरी नावाच्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तो हुशार आणि जिद्दी होता. त्याला शिक्षणाची खूप आवड होती आणि तो नेहमी वर्गात अव्वल येत असे. तो शिक्षणाबरोबरच खेळांमध्ये ही आवडीने भाग घ्यायचा आणि शिक्षक व मित्रांचा तो आवडता होता. लहानपणापासूनच राजेशच्या मनात देशसेवेची तीव्र इच्छा होती. त्याला लष्करात भरती होऊन देशाचे रक्षण करायचे होते. त्याने अनेक वीर सैनिकांच्या कथा वाचल्या आणि त्यांच्यापासून त्याने प्रेरणा घेतली होती. राजेशचे आईवडील त्याच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्नशील होते. त्यांनी त्याला चांगल्या शिक्षणाची सुविधा देण्यासाठी कधीही कसरत ठेवली नाही. राजेशनेही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले.
विज्ञान शाखेची निवड आणि लष्कराचं स्वप्न:
10वी उत्तीर्ण झाल्यावर राजेशने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्याला विज्ञानाची आवड होती आणि त्याचबरोबर त्याच्या मनात लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती. 12वी उत्तीर्ण झाल्यावर लष्करात भरती होण्याचा त्याचा निश्चय होता.पण त्याच्या घरातील लोकांनी त्याला सेकंड ऑप्शन म्हणून त्याला BSC ला प्रवेश घेण्याचा आग्रह केला. त्यांचं म्हणणं होतं की BSC चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला लष्करात भरती होण्यासाठी अधिक चांगल्या संधी मिळतील. राजेशने घरच्यांचं म्हणणं मान्य केलं आणि BSC ला प्रवेश घेतला. BSC चं शिक्षण घेत असतानाही राजेशने लष्करात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम सुरू ठेवले. तो नियमित व्यायाम करत असे आणि धावण्याचा सराव करत असे. त्याचबरोबर तो लष्कराच्या भरती परीक्षांची तयारीही जोरात करत होता. 2016 वयाच्या 18 व्या वर्षी त्याने सोलापूर ARO मध्ये तांत्रिक पदासाठी अर्ज केला. लष्करात भरती होण्याची त्याची तीव्र इच्छा आणि देशसेवेची तीव्र भावना त्यांच्या मनात होती. राजेशने धावण्याच्या चाचणीत उत्तम कामगिरी करत यश मिळवले. त्याची वेग आणि सहनशक्ती लष्करासाठी आवश्यक निकषांनुसार होती.धावण्याच्या चाचणीत यश मिळवल्यानंतर राजेशला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आले. लष्करासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याला अडथळा आला आणि भरती होता आले नाही.
अनेक अपयश आणि हार न मानण्याची जिद्द:
2017 मध्ये पुन्हा लष्करात भरतीचा प्रयत्न करूनही धावण्याच्या चाचणीत तो अपयशी ठरला. 2018 मध्ये SSC GD मध्ये त्याने पहिल्यांदा भरती दिली. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम मेरिट यादीत नॉर्मलायझेशनमुळे तो 0.25 अंकांनी चुकून गेला. हे त्याच्यासाठी खूप दुःखद आणि निराशाजनक होतं..या अनेक अपयशांमुळे राजेश निराश झाला होता. पण त्याने हार मानली नाही. 2019 मध्ये, राजेशने BSC मध्ये पदवी प्राप्त केली आणि आपला खर्च भागवण्यासाठी व घरात आर्थिक हातभार लागावा म्हणून एका कंपनीत काम करायला सुरुवात केली. पण वर्दी मिळवण्याचं त्याचं स्वप्न त्याला गप्प बसू देत नव्हतं. त्याच्या मनात देशसेवेची तीव्र इच्छा होती आणि तो लवकरच पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्याने आर्मी भरती सोडून पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला.
2021 मधील पोलीस भरती आणि राजेशचा संघर्ष:(Marathi motivational story)
पहिल्यांदाच लेखी परीक्षा:
2021 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदाच लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राजेशने या परीक्षेसाठी जिवाच्या आकांताने अभ्यास केला. त्याने SRPF गट 11, नवीन मुंबई येथे लेखी परीक्षेत 100 पैकी 90 आणि मैदानी चाचणीत 100 पैकी 95 गुण मिळवून एकूण 200 पैकी 185 गुण मिळवले. EWS श्रेणीत तो पहिल्या क्रमांकावर वेटिंग लिस्टमध्ये होता.
पालघर पोलीस भरती आणि दुखापत:
त्यांनी त्या वेळी पालघर पोलिस चा पण अर्ज भरला होता, पालघर पोलीस भरतीमध्येही राजेशने लेखी परीक्षेत 100 पैकी 93 गुण मिळवून उत्तम कामगिरी केली. परंतु 100 मीटर धावताना त्याच्या लिगामेंटला दुखापत झाली आणि तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्या अपयशानंतर राजेश मात्र पुरता खचला हे अपयश खूप दुःखद आणि निराशाजनक होते. या कठीण काळात राजेशच्या कुटुंब आणि मित्रांनी त्याला खंबीरपणे आधार दिला. त्यांनी त्याला समजावून सांगितले की यश मिळवण्यासाठी अनेक अडथळे आणि अपयश पार करावे लागतात. त्यांनी त्याला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
पुन्हा शून्यातून सुरुवात आणि यशाची कहाणी: Success story
2021 मधील पोलीस भरतीत राजेशला अपयश आलं. 100 मीटर धावताना त्याला दुखापत झाली आणि त्याचं स्वप्न भंग झालं. तो खूप निराश आणि हताश झाला होता. कुटुंब व मित्रांनी आधार दिल्यामुळे राजेशने हार मानली नाही. त्याने पुन्हा उभे राहण्याचा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्याने दुखापतीवर उपचार घेतले आणि पुन्हा अभ्यास आणि तयारीला सुरुवात केली. 2023 मधील पोलीस भरतीत राजेशने पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी त्याला यश मिळालं. त्याची सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड झाली. त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.राजेशच्या यशामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य बदलून गेलं. राजेशचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याला लोकांची सेवा करण्याची पोलिस खात्यात काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या कुटुंबातील मुलगा पोलिस झाल्याबद्दल त्याच्या कुटुंबाला त्याचा अभिमान आहे.
राजेशची कथा आपल्याला शिकवते की, यश मिळवण्यासाठी कधीही हार मानू नये. अनेक अडथळे आणि अपयश येतील, पण जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर आपण नक्कीच आपले स्वप्न सत्यात उतरवू शकतो. राजेशची ही Marathi motivational story तुम्हाला काशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा.
राजेश यांच्या सारखे तुम्हाला ही जीवनात यशस्वी व्ह्ययचे असेल तर,
MPSC Police Bharti Guru – तुमच्या यशाचा सोबती!
मग ते UPSC असो, MPSC असो, पोलिस भरती असो, कोणतीही परीक्षा जिंकण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचंय? तर मग आजच “MPSC Police Bharti Guru” या संकेतस्थळाला भेट द्या. अनुभवी मार्गदर्शकांच्या One Liner Notes आणि Topicwise Quiz च्या साहाय्याने तुमच्या स्वप्नांच्या परीक्षेची तयारी करा आणि राजेश सारखी यशोगाथा रचा!
या स्पर्धापरीक्षांच्या लढाईत “MPSC Police Bharti Guru” तुमच्या सोबत आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवा, मेहनत घ्या आणि यश तुमच्या पायाशी येईल!
तुमचे ब्लॉग मस्त असतात मी ते रोज वाचतो. मीही स्पर्धा परीक्षेचा study करतो आणि मला ह्या succes story motivate करतात अनकी जोरात study करायला.