पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार्या दिक्षा शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास(Marathi motivational story)
पोलिस बनणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करणं वाटत तितक सोपं नाही. यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि धैर्य हे असे गुण असणे आवश्यक आहे. आज आपण दिक्षा सुनिल शिंदे यांच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी अनेक अडचणींवर मात करून पोलिस बनण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले.
दिक्षा यांच्याबद्दल:
पुणे :- दिक्षा यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील अंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात पोलिस अधिकारी बनण्याची इच्छा होती. खाकी वर्दी, कडक शिस्त आणि समाजसेवा या गोष्टींनी त्यांचे मन मोहित केलं होते. दिक्षा एका सामान्य कुटुंबातील मुलगी होती. त्यामुळे घरातील परिस्तिथीची व आई वडिलांच्या कष्टाची जाणीव अगदी त्यांना होती. लहानपणापासूनच त्या हुशार आणि जिद्दी होत्या. शाळेत त्या नेहमी अभ्यासात अव्वल असायच्या. व सर्व शिक्षक जणांच्या त्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. दहावीला चांगले मार्क्स मिळाले होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिक्षा खूप आनंदी होत्या. त्यांना कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता पण दिक्षा यांच्या कुटुंबियांचा विज्ञान शाखेवर भर होता. त्यांच्या मते, विज्ञान शाखेतूनच नोकरीच्या चांगल्या संधी मुलांसाठी उपलब्ध होतात. दिक्षाच्या आईवडिलांना तिची काळजी होती. कला शाखेतून तिला चांगलं भविष्य मिळेल याची त्यांना खात्री नव्हती. दिक्षा कुटुंबियांच्या विरोधात जाऊ इच्छित नव्हत्या. आई वडिलांच्या भावनांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं. मनात नसतानाही त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. कला शाखेचं स्वप्न मनातल्या मनात दडपून तिने विज्ञान शाखेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना थोडं अवघड जात होतं. पण हळूहळू त्यांनी त्या परिस्थितीशी जुळवून घेतले. विज्ञान शाखेतील अभ्यासातही त्यांनी चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. कला शाखेची आवड मनातून पूर्णपणे गेली नाही, तरीही त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःला ढाळून घेतले.
दिक्षा आणि त्यांच्या खाकीच्या प्रवासाला सुरुवात:
सायन्स शाखेतून 12वी उत्तीर्ण झाल्यावर दिक्षा यांच्या समोर दोन रस्ते होते. एका बाजूला कुटुंब आणि समाजाच्या अपेक्षा, तर दुसऱ्या बाजूला लहानपणापासूनच जपलेलं पोलिस अधिकारी बनण्याचं स्वप्न. घरी पोलिस होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी संगितले. सुरुवातीला कुटुंबियांना थोडी चिंता होती. पोलिसांचे काम कठीण आणि धोकादायक आहे हे त्यांना माहीत होते. पण दिक्षाच्या दृढनिश्चयाला आणि जिद्दीला पाहून घरातील त्यांना नकार देऊ शकले नाहीत.घरातील लोकांनी ही त्यांना पोलिस भरती करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी दिला. त्यांनी त्वरित पोलिस भरतीची तयारी सुरू केली.त्यानंतर त्यांनी एक पोलिस भरतीची अकादमी जॉईन केली. शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारली आणि नियमित व्यायाम करण्यास सुरुवात केली. अभ्यासासाठी एक वेळापत्रक बनवलं आणि त्यातून त्या कठोर अभ्यास करू लागल्या. 2014 मध्ये पहिली भरती देण्याचा निर्धार केला पणवय कमी असल्याने भरती देता आली नाही. निराश न होता दिक्षा यांनी आपली प्रॅक्टिस चालू ठेवली
2018-2021: संघर्ष आणि धैर्याची कसोटी (Marathi motivational story)
दिक्षा आणि त्यांचा तीन वर्षांचा पोलिस भरतीचा हा पुढील प्रवास सोपा नव्हता. 2016 ला पुणे शहर पोलिस भरती परीक्षेसाठी अर्ज भरला. अभ्यासासाठी कठोर परिश्रम घेतले. पहिलीच भरती असल्या कारणाने तणाव आणि चिंतेमुळे परीक्षेत चांगली कामगिरी करू शकल्या नाही. निकाल लागल्यावर आपण फेल होणार याची त्यांना कल्पना होती. त्यानंतर 2017 मध्ये त्या महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) ची भरती सुटली त्या भरतीत त्यांची निवड झाली व त्या महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये सामील झाल्या आणि दरम्यान त्या दरम्यान पोलीस भरती परीक्षेसाठी प्रयत्न करत राहिल्या. त्यांनी दररोज कामावरून घरी आल्यावर अभ्यासासाठी वेळ दिला. MSF मध्ये काम करणं आणि अभ्यासासाठी वेळ देणं हे दिक्षा यांना कठीण होत होत. त्यांना थकवा आणि वेळेची कमतरता जाणवत होती. पण त्यांनी हार मानली नाही आणि आत्मविश्वास टिकवून ठेवला. 2017 मध्ये दिक्षा यांनी ठाणे पोलिस भरती परीक्षा दिली. यशाची आशा होती, पण निकालात त्या 2 मार्क्सने वेटिंगमध्ये राहिल्या. निराशा होती, पण हार नव्हती. त्यांनंतर 2018 मध्ये दिक्षा यांनी मुंबई शहर पोलिस भरती परीक्षा दिली पण निकालात त्या 3 मार्क्सने वेटिंगमध्ये राहिल्या. वारंवार दोन-तीन मार्काने अपयश येत होते. अपयशामुळे दिक्षा खिन्न झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांसाठी परीक्षेचा विचार टाळण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित केले. मग त्यांनी त्यांचा MSF मधील आहे तो जॉब कंटिन्यू करायचे ठरवले. काही काळानंतर त्यांनी 2021च्या भरती साठी फॉर्म भरला आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी पुन्हा 2 मार्क्स नी वेटिंग ला राहावे लागले. यशाच्या अगदी जवळ पोहोचूनही यश मिळालं नाही तर काय वाटतं? निराशा, हताश, राग… सगळ्या भावना एका क्षणात डोक्यातून धावून जातात. पण दिक्षा हार मानणार्या नव्हत्या त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.
2022: पुन्हा एकदा प्रयत्न आणि यशाची गोडी
2021 मध्ये वेटिंगमध्ये राहिल्यानंतर दिक्षा थोड्या हताश झाल्या होत्या, पण त्यांनी हार मानली नव्हती. लहानपणा पासूनच त्यांचे वर्दी मिळवण्याचे स्वप्न त्यांना गप्प बसू देत नव्हते. तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि यावेळी अधिक कठोर परिश्रम घेतले. झालेल्या मागील वर्षांच्या चुका आणि अनूभवातून शिकून तिने मुंबई पोलिस भरती चा फॉर्म भरला. त्यांनी दिवसरात्र अभ्यास करून स्वतःला यशासाठी तयार केले. परिक्षा दिली लेखी व ग्राऊंड दोन्ही उत्तम झाले या वेळी फिक्स अंगावर वर्दी येणार याचा दिक्षा यांना पूर्ण आत्मविश्वास होता आणि त्या रिजल्ट च्या दिवसाची वाट पाहत होत्या. रिजल्टचा दिवस आला आणिअखेर दिक्षाचे स्वप्न पूर्ण झाले. ती मुंबई पोलिस दलात निवड झाली! निवडीची बातमी ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. त्यांनी ही बातमी त्यांच्या आईवडिलांना सांगितली तेव्हा तरआईवडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. दिक्षा यांनी आपल्या यशाचा श्रेय कुटुंब आणि मित्रांना दिले.
दिक्षा यांची कथा आपल्याला प्रेरणा देते की आपण आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहिलो तर यश नक्की मिळतं.
MPSC Police Bharti Guru – तुमच्या यशाचा सोबती!
मग ते UPSC असो, MPSC असो, पोलिस भरती असो, कोणतीही परीक्षा जिंकण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचंय? तर मग आजच “MPSC Police Bharti Guru” या संकेतस्थळाला भेट द्या. अनुभवी मार्गदर्शकांच्या One Liner Notes आणि Topicwise Quiz च्या साहाय्याने तुमच्या स्वप्नांच्या परीक्षेची तयारी करा आणि ज्ञानेश्वरीसारखी यशोगाथा रचा!
या स्पर्धापरीक्षांच्या लढाईत “MPSC Police Bharti Guru” तुमच्या सोबत आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवा, मेहनत घ्या आणि यश तुमच्या पायाशी येईल!