- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी मल्टिपल ऑर्गन सिस्टीम फेल्युअरमुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
>जीवन परिचयः
- गोखले यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४५ पुणे येथे झाला.
विक्रम गोखले त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या स्त्री अभिनेत्री होत्या, तर त्यांची आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल- अभिनेत्री होत्या.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि रंगमंच कलाकार होते
- विक्रम गोखले त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली होती. विजया मेहता यांचे ‘बॅरिस्टर’ हे नाटक त्यांनी अक्षरशः गाजवले. ‘स्वामी’ या नाटकाने त्यांच्या करिअरला एक दिशा मिळवून दिली.
- नुकताच प्रदर्शित झालेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. याआधी ते ‘सताड उघड्या डोळ्यांनी’ या बेबसीरिजमध्ये दिसले होते.
- अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते.
- २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- घशाच्या त्रासामुळे २०१६ मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता.
- अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वतःची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दिली होती.
- काही वादग्रस्त विधानांमुळे देखील ते अलीकडे चर्चेत आले होते.
- पुरस्कार व सन्मानः विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), बलराज साहनी साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार इत्यादी.
- विक्रम गोखले त्यांची गाजलेली नाटके: एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांच।
- जखमों का हिसाब, जज़बात, जय बाबा अमरनाथ, तडीपार, तुम बिन, थोडासा रूमानी हो जाय, धरम संकट, परवाना, प्रेमबंधन, फलक द स्काय, बदमाश, बलवान, यही है जिंदगी, याद रखेगी दुनिया, लाईफ पार्टनर, लाड़ला, श्याम घनश्याम, सती नाग कन्या, सलीम लंगडे पे मत रो, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम, हसते हसते, हे राम
त्यांच्या दूरचित्रवाणी मालिकाः
- अकबर बिरबल, अग्निहोत्र, अल्पविराम, उडान, कुछ खोया कुछ पाया, जीवनसाथी, द्विधाता, मेरा नाम करेगा रोशन, या सुखांनो या (मराठी), विरुद्ध, संजीवनी, सिंहासन, ‘तुझेच मी गीत गात आहे