- प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शैक्षणिक आणि माजी केंद्रीय मंत्री प्रो. योगिंदर के अलघ (म्हणजेच वाय. के. अलघ) यांचे डिसेंबर २०२२ मध्ये अहमदाबाद येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
- ते अहमदाबादस्थित सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्च (SPIESR) येथे एमेरिटस प्राध्यापक होते.
- १९३९ मध्ये सध्याच्या पाकिस्तानातील चकवाल येथे जन्मलेल्या अलघ यांनी राजस्थान विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
- भारतातील दारिद्रयरेषेची पहिली विस्तारित आणि समर्पक व्याख्या त्यांनी केली होती. ते नियोजन आयोगाच्या कृती गटाचे अध्यक्ष असताना उष्मांकांची (कॅलरीज) कमतरता हा नवा निकष वापरून शहरी आणि ग्रामीण गरिबांची स्वतंत्र दारिद्रयरेषा निश्चित करण्याचा नवा दृष्टिकोन १९७९ मध्ये स्वीकारला गेला
- १९८०च्या दशकात त्यांनी कृषी मूल्य आयोग दिए (एपीसी) आणि औद्योगिक व्यय आणि शुल्क विभागात (बीआयसीपी) आर्थिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली. एपीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अर्थमिती कक्ष स्थापन केला. हा कक्ष पिकांसाठी किमान आधारभूत किमतींची शिफारस करतो. बीआयसीपीमधील त्यांच्या योगदानात पोलाद, सिमेंट आणि अॅल्युमिनियम यांचे भाव नियंत्रित ठेवण्याचा प्रामुख्याने समावेश होता.
- उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रा. अलघ यांच्या सन २००० मधील अहवालाने सहकारी उद्योगांचा ‘उत्पादक कंपन्या’ बनण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला.
- आयआयएम कोलकातामध्ये साहायक प्राध्यापक, जेएनयूचे कुलगुरू, आणंद येथील इन्स्टिटयूट ऑफ रूरल मॅनेजमेंटचे अध्यक्षपद, संयुक्त आघाडी सरकारच्या काळात ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणी या खात्याचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कायर्भार, नियोजन आयोगाचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.
- त्यांचा ‘फ्युचर ऑफ इंडियन अॅग्रिकल्चर’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे